यावल : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणांमध्ये सध्या शंभर टक्के जलसाठा झाला असून सांडव्याद्वारे पाणी वाहू लागले आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच निंबादेवीचा सांडवा वाहू लागल्याने सातपुडा पर्वतात पर्यटक आता येऊ लागले आहेत.
पर्यटकांची धरणावर वाढली गर्दी
यावल तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ निंबादेवी धरण आहे सातपुड्याच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये धरणावर सांडव्यात आंघोळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्ह्यातून पर्यटक या ठिकाणी येत आहेत. सध्या सातपुड्यात रीपरीप पाऊस सुरू असून या पावसात निसर्ग सौंदर्य हे प्रेक्षणीय ठरत आह. या निसर्गसौंदर्यात सहलीसाठी जिल्हाभरातील पर्यटक सातपुड्याच्या भेटीला येण्यासाठी उत्सुक असतात व आता निंबादेवी धरण शंभर टक्के भरल्यानंतर सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात अजून भर पडली आहे.