वनविभागाचे 150 कर्मचारी 24 तास गस्तीवर
अडावद- सातपुडा पर्वत रांगामध्ये वनविभागातर्फे जंगल वाचवा मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वनविभागाचे 100 ते 150 कर्मचारी 24 तास गस्तीवर असून वणवा लावणार्यांवर लक्ष ठेवत आहे. वणवा लावणार्या दोघांना अटक झाल्यानंतर आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. वनविभागाच्या अधिकार्यांनी यावल वन विभागात सातपुडा परिसरात लागलेल्या वणव्याची पाहणी केली.
अधिकार्यांकडून पाहणी
गेल्या पंधरा दिवसांपासून वणवा लावण्याचे प्रकार वाढल्याने वनविभागाने ही मोहीम तीव्र केली आहे. वन अधिकार्यांनी पाहणीही केली. यावेळी दरम्यान, मुख्य वन संरक्षक टी. एन. साळुंखे, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे श्री. वावरे, यावल उपवनसंरक्षक श्री. दहिवले, चोपडा सहाय्यक वन संरक्षक व्ही. एच. पवार, वैजापूरचे एम.बी. पाटील, चोपड्याचे पी. बी. पाटील आदींची उपस्थिती होती. नुकतेच सातपुडा पर्वतरांगांमधील कुंडपाणी जवळ दोघांना कुर्हाड, विळा, बीडी, अशा वस्तुंसह ताब्यात घेण्यात ाले होते. चांदण्या-तलाव भागात 3 जणांना पकडण्यात आलेले होते. यात गफुर नबाब तडवी, दगडू नथ्थु तडवी यांना रंगेहाथ पकडले. जागेवर पंचनामा करुन कागदपत्रे तयार करण्यात आली होती. यात अकबर अमीर तडवी याची चौकशी करुन सोडून देण्यात आले होते. संजय दहीवले यांच्या मार्गदर्शसनाखाली गस्तीसाठी विविध पथके तयार करण्यात आलेले असून ही पथके वणवा पेटविणार्यांवर ल क्ष ठेवून आहेत.