सातवी अध्यक्षीय चषक कॅरम स्पर्धा 20 ऑगस्टपासून

0

मुंबई। मुंबई जिल्हा कॅरम संघटना आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ते 23 ऑगस्टदरम्यान सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा कल्याण भवन हॉल, पश्चिम रेल्वे माटुंगा ( पूर्व ) येथे सातव्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, मुले एकेरी ( 18 वर्षाखालील ) व मुली एकेरी ( 18 वर्षाखालील ) अशा 4 गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विजेत्या खेळाडूंना 40 हजारांची रोख पारितोषिके व अध्यक्षीय फिरता चषक देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूंनी मुंबई जिल्ह्याला संल्गन असलेल्या क्लबमार्फत आपल्या प्रवेशिका 13 व 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान स्पर्धेच्या ठिकाणी जिल्ह्याचे सचिव यतीन ठाकूर यांच्याकडे आणून द्याव्यात. या स्पर्धेतून आगामी राज्य अजियक्य पद कॅरम स्पर्धांसाठी मुंबईचे प्राधिनिधिक संघ निवडले जातील.