मुंबई:- सातारा येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची जागा कायमस्वरुपी हस्तांतरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
हे देखील वाचा
शासनाकडून सातारा येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेस सलग 25 एकर जागा आवश्यक असते. गरजू रुग्ण व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयाचा परिसर सातारा शहरालगत असणे आवश्यक आहे. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा विनाअट व विनामूल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.