यावल- तालुक्यातील सातोद येथील एका 25 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी तुषार एकनाथ फेगडे (रा.सातोद हल्ली, मुक्काम चितोडगड, राजस्थान) विरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला आरोपीने विवाहितेशी संवाद साधला मात्र समाजात बदनामीपोटी विवाहितेने तक्रार दिली नाही मात्र 5 रोजी पुन्हा आरोपीने पुन्हा कृत्य केल्यानंतर त्यास समज देण्यात आली व त्यानंतर गुरुवार, 7 मार्च रोजी विवाहिता शेतात जात असतांना तिच्याशी अश्लील वर्तन आरोपीने केल्यानंतर तिने कुटुंबियांना घरी माहिती सांगितल्यानंतर त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.