सात हजार रुपये किंमतीचे पाईप चोरीला

भुसावळ : तालुक्यातील बोहर्डी शिवारातून चोरट्यांनी सात हजार रुपये किंमतीचे पाईप लांबवले. शेतकरी इंद्रसिंग गुलाबसिंग पाटील (बोहर्डी बु.॥) यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या शेत गट क्रमांक 173 व 169/1 मधील शेतातून 9 ते 10 जुलैदरम्यान चोरट्यांनी सात हजार रुपये किंमतीची पीव्हीसी पाईप लांबवले. तपास एएसआय नरसिंग चव्हाण करीत आहेत.