हडपसर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत अनिवासी गुरूकूल प्रकल्पाचे स्नेहसंमेलन तीन दिवसात उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच स्वतःमधील कलागुण, ओळखून त्याचा विकास करण्याची संधी मिळावी व यातूनच भावी कलाकार निर्माण व्हावेत, विद्यार्थ्यांनी जीवनाचा मनमुराद आनंद मिळवावा या हेतूने स्नेहसंमेलन हा सहशालेय उपक्रम राबविण्यात येतो.
साधना विद्यालयातील गुरुकूल आणि इतर विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाचे दर्जेदार व गुणात्मक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एस. जे मोहिते, उपमुख्याध्यापक एस. बी.कुलकर्णी , पर्यवेक्षक एम. वाय. कांबळे, आय. एस. जगताप, डी .डी.सुर्यवंशी , गुरूकूल प्रमुख एन.एस.व्यवहारे , एम. जे. ढोणे, गुरूकूल सांस्कृतिक विभागप्रमुख एस. एस. शेख, एस .के. रूपनवर , पालक -शिक्षक संघाचे सदस्य, बहुसंख्येने पालकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.