नवी दिल्ली:साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा आयपीएस संघटनेने निषेध केला आहे. अशोक चक्र पुरस्कार विजेते हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांविरुद्ध लढा देताना सर्वोच्च बलिदान दिले. भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाचा आम्ही निषेध करतो असे आयपीएस असोशिएशनने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले