मेलबोर्न : भारताची दिग्गज महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि इवान डोडीग या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली आहे. क्वार्टर फायनलमध्ये आज सानिया-डोडिग जोडीने भारताचा टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना आणि ग्रॅबिएला डाब्रोव्स्कीच्या जोडीवर मात करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सानिया-डोडिगने बोपन्ना आणि डाब्रोव्स्कीच्या जोडीने एक तास सात मिनिटांपर्यंत चाललेल्या स्पर्धेत ६-४, ३-६, १२-१० ने मात करुन सेमीफायनलमध्ये पाऊल ठेवले.
पेस-मार्टिनाशी सामना होण्याची शक्यता
सेमीफायनलमध्ये सानिया आणि डोडिगचा सामना भारताच्या लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगिस किंवा ऑस्ट्रेलियाच्या सामंता स्तोसुर वा सॅम ग्रोथ यापैकी एका जोडीशी होणार आहे. सानिया व इव्हानने रोहन बोपण्णा आणि गॅब्रियल दाब्रोवास्की यांचा ६-४, ३-६, १२-१० असा पराभव केला. एकूण ६७ मिनिटे चाललेल्या या खेळात भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची कॅनडाची साथीदार गॅब्रियलने काही चांगल्या संधी गमावल्या. या पराभवासोबतच बोपण्णाचा नव्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमचा प्रवासही संपुष्टात आला आहे. दरम्यान सानिया आणि इव्हानचा पुढच्या फेरीत लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस यांच्याशीच सामना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
फेडररची उपांत्य फेरीत धडक
कॅनबेरा: स्वित्झर्लंडचा माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर असलेल्या फेडररनं उपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या मिशा झ्वेरेव्हवर सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. फेडररनं हा सामना 6-1, 7-5, 6-2 असा जिंकला आणि कारकीर्दीत तेराव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठली. 36 वर्षीय फेडररला आता त्याच्याच देशाच्या म्हणजे स्वित्झर्लंडच्या स्टॅनिस्लास वावरिंकाचा मुकाबला करायचा आहे. चौथ्या मानांकित वावरिंकाने फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाचं आव्हान 7-6, 6-4, 6-3 असे मोडीत काढले.