सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा

 

मेलबर्न – भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने २०२२ हे कारकीर्दीतील अखेरचे वर्ष असल्याची घोषणा बुधवारी केली. यावेळी त्या म्हणाल्या कि, ‘‘ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेमधील एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीमधील अनेक उत्तम आठवणी माझ्याकडे आहेत. ही वाटचाल अप्रतिम होती. जून किंवा जुलैपर्यंतच्या स्पर्धाविषयी मी कोणतीही आखणी केलेली नाही. शरीराची तंदुरुस्ती, करोनाचे आव्हान यामुळे आयुष्यातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मी पुढील आठवडय़ाविषयीच धोरण आखत आहे,’’

 

मार्च २०१९मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर ३५ वर्षीय सानियाने पुनरागमन केले. मात्र करोनाच्या साथीमुळे तिच्या वाटचालीवर परिणाम झाला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभवानंतर सानियाने निवृत्तीची घोषणा केली. महिला एकेरीतही सानियाने जागतिक क्रमवारीत २७व्या क्रमांकापर्यंत मुसंडी मारली होती. परंतु मनगटाच्या दुखापतीमुळे सानियाने एकेरीऐवजी दुहेरीकडे लक्ष केंद्रीत केले आणि तिला अनपेक्षित यश मिळाले.