सानिया मिर्झाने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

0

दिल्ली :भारत आणि पाकिस्तान संघामधील हाय व्होल्टेज सामन्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दारुण पराभव पत्करल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान बुधवारी एकमेकांसमोर उभे ठाकतील, तेव्हा संपूर्ण विश्वाचे लक्ष या सामन्याकडे वेधले जाईल. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे व लढतीच्या विशेष दडपणामुळे या सामन्याला क्रिकेटच्या व्यासपीठावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सानिया मिर्झाने एक महत्वाचा निर्णय घेत सोशल नेटवर्किंगवरून पुढील काही दिवसांसाठी काढता पाय घेतला आहे. यासंदर्भात तिने स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे.

सानिया आपल्या ट्वटिमध्ये म्हणते, भारत पाकिस्तान सामन्याला २४ तासांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवरून पुढील काही दिवसांसाठी लॉग आऊट होणेच माझ्यासाठी योग्य ठरेल. कारण या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर चर्चा केले जाणारे विषय एखाद्या सामान्य व्यक्तीला त्रासदायक ठरू शकतात. त्यातच गरोदर असल्याने मी यापासून लांब एकट राहण्याचा प्रयत्न करेल. स्वत:ला झोकून द्या पण एक लक्षात ठेवा हा केवळ एक क्रिकेटचा सामना आहे. या ट्विटमधून तिने ट्रोलर्सला संदेशच दिला आहे.