मुंबई। भारत पाकचा कोणत्याही खेळातील सामना असला की चांगलाच रंगतो.त्या-त्यात तो जर क्रिकेट असेल तर अजुन रंगतो.असाच सामना रविवारी चॅम्पियन ट्रॉफीत भारत – पाक मध्ये पाहायला मिळणार आहे. भारताच्या या विजयानंतर सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांना आप आपला संघ दुसर्या संघावर भारी पडेल असे वाटत आहे.मात्र व्टिटवर सानिया मिर्झाने केलेल्या सूचक प्रतिक्रिया नंतर चाहत्यांनी तिलाचा व्टिटवर प्रश्नांचा भडीमार करून तु कोणाच्या बाजुने पाकिस्तान कि भारत असा प्रश्न उपस्थित करू टाकला आहे.
तू कोणाच्या बाजूने पाकिस्तान की भारत ?
चॅम्पियन ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना युद्ध नव्हे तर खेळ म्हणून पाहा, अशा आशयाचे सूचक ट्विट केले आहे.कारण सानिया मिर्झाचा पतीदेव शोएब मलिक हा पाकिस्तान संघाकडून खेळत आहे.तर ती टेनिसमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करित आहे.त्यामुळे पतीदेव की आपला देश जेथे जन्म झाला.यामुळे सानियाने जरी सूचक असे व्टिट केले असले तरी चाहत्यांना प्रश्न पडला की सानिया नेमकी कोणाचे समर्थन करणार आहे.त्यामुळे त्यांनी थेट व्टिट व्दारे तीलाच प्रश्न विचारून टाकला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य सामन्यानंतर इंद्रनील दास यांनी भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी हा सामना खेळ भावनेने पाहावा, अशा आशयाचे ट्विट केले. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलंय की, रविवारच्या सामन्याकडे फक्त खेळ म्हणून पाहायला हवे. हा सामना जगणे किंवा मरणे यासाठीचे युद्ध नाही. स्पर्धेतील तो एक महत्त्वाचा सामना आहे. इंद्रनील दास यांनी केलेले ट्विट सानियाने रिट्विट केले आहे. त्यामुळे या ट्विटच्या माध्यमातून रविवारी मैदानावर रंगणारा सामना खेळ म्हणून पाहावा, असे तिने सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. स्वत: खेळाडू असल्यामुळे मैदानातील महामुकाबला खिलाडूवृत्तीने पाहाण्याचा तिच्या सूचक रिट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.