सानिया-शेडोव्हा विजयी

0

रोम : इटालियन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची कझाकस्तानची साथीदार शेडोव्हा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. सानिया आणि शेडोव्हा यांना पुढे चाल मिळाली. त्यांची प्रतिस्पर्धी जोडी युक्रेनची सॅव्हचुक आणि स्विटोलिना टेनिस कोर्टवर उतरू शकली नाही. मियामि टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि स्ट्रायकोव्हा या जोडीला दुहेरीच्या अंतिम सामन्यात डेब्रोव्हेस्की आणि इफान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.