केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे यांचे प्रतिपादन
जळगाव – तालुक्यात म्हसावद समूह साधन केंद्रातील जि.प.शाळा बिलवाडी येथे २४ डिसेंबर रोजी पूज्य साने गुरुजी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून म्हसावद केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे उपस्थित होते. उपशिक्षक संदिप पाटील यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘मिराकास्ट’ या डिव्हाईसच्या साहाय्याने एलईडी टीव्ही वर साने गुरुजींच्या जीवनावर आधारित कविता, गाणी विद्यार्थ्यांना दाखवली.विद्यार्थिनी सारिका उमरे, यामिनी मराठे, सुमित्रा गायकवाड यांनी भाषणे केली.
बिलवाडी शाळेत साने गुरूजींना अभिवादन
यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे यांनी सांगितले की, साने गुरुजी हे अत्यन्त प्रेरणादायी शिक्षक तसेच भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. ‘श्यामची आई’ च्या एकपात्री प्रयोगांनी तर संस्काराची शिदोरी अधिकच घट्ट केली. गुरुजींनी अमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खान्देशला कर्मभूमी बनविले. गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. यावेळी शिक्षिका नीता जोशी, अर्चना पाटील, उपस्थित होते. सुत्रसंचलन संदिप पाटील यांनी तर आभार नीता जोशी यांनी मानले.