चाळीसगाव – येथील साने गुरूजी प्राथमिक विद्या मंदीरात महात्म गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शहरातून प्रभात फेरी काढून स्वच्छता व गोवर रूबेला लसीकरणाबाबद जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेत पोस्टर तयार करणे, रांगोळी काढणे, मेहंदी काढणे, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी अविनाश घुगे तर मार्गदर्शक म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा महाले होत्या. व्यासपिठावर संगिता महाले, उमेश माळतकर, मनिषा पाटील, किशोर सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास बोरसे यांनी केले तर आभार महेंद्र कुमावत यांनी मानले. यशस्वितेसाठी शारदा मोरे, आरती राणे, बी.एड.चे छात्रशिक्षक मनेश पावरा, मानसिंग पाडवी, बिंदल वसावे, विजय पावरा, ठोग्या वसावे यांनी परीश्रम घेतले.