अमळनेर । येथील पंचायत समिती शिक्षण विभाग व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 43 वे तालुका विज्ञान प्रदर्शन स्टेम 2017 चे आयोजन साने गुरुजी विद्यालयात सकाळी 11 वाजता करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आ शिरीष चौधरी हे तर उद्घाटन आमदार स्मिता वाघ करणार आहेत.
5 व 6 डिसेंबर ह्या दोन दिवस चालणार्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख अतिथी माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,जिप सदस्यां जयश्री पाटील,मिनाबाई पाटील,संगीता भिल,सोनु पवार,पस सभापती वजाबाई भिल, उपसभापती त्रिवेणीबाई पाटील, माध्य शिक्षणाधिकारी देविदास महाजन, पं.स. सदस्य रेखा पाटील, कविता पाटील, भिकेश पाटील, विनोद पाटील, प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, 6 गटविकास अधिकारी संदीप वायाळ आदी उपस्थित राहणार आहेत. बुधवार 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी इच्छुकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, आयोजक एस.डी.देशमुख, अनिता बोरसे व सानेगुरुजी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी केले आहे.