नंदुरबार । येथील रेल्वे उड्डाणपुलावर सापडलेली तीन हजार रुपयांची रोकड व काही महत्वाची कागदपत्रे संबंधित इसमाच्या शोध घेऊन त्यांना परत केल्याने नंदुरबार येथील पत्रकार जगदीश ठाकूर यांचा एका सेवाभावी संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. 7 डिसेंबर रोजी उड्डाणपुलावरून जात असताना रस्त्यावर पाकिट सापडले होते.
या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकार्यांनी सापडलेल्या मूळ कागदपत्रांवरून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीच्या शोध घेतला असता सदरची रक्कम व कागदपत्रेही रेल्वेचे कर्मचारी विशाल मदनलाल खुर्च्यांचे असल्याचे स्पष्ट झाले खोरे हे रेल्वेत सहाय्यक लोको पायलट म्हणून कार्यरत असून त्यांची हरवलेली रोकड व कागदपत्र जगदीश ठाकूर यांच्या असते सुपूर्द करण्यात आली या कामगिरी बद्दल पत्रकार जगदीश ठाकूर यांच्या सेवाभावी संस्थेतर्फे हस्ते सत्कार करण्यात आला आहे
महत्त्वाची कागदपत्रेही सुपुर्द
नंदुरबार येथील जगदीश ठाकूर हे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत दिनांक 7 डिसेंबर रोजी त्यांना शहरातील उड्डाणपुलावरून जात असताना रस्त्यावर पाकिट सापडले त्यांनी ते पाकीट उचलून उघडून बघितले असता त्यात 3200 रुपयांची रोकड व पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि दोन एटीएम कार्ड तसेच रेल्वेची महत्वाची कागदपत्रे घडून आली यावेळी पत्रकार जगदीश ठाकूर यांनी रोकड व इतर कागदपत्रे इस्माईल दगू जनसेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांच्याकडे सुपूर्द केले.