साबळे, शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0

जळगाव । जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. संदर्भात खोटी माहिती प्रसिद्ध करून बदनामी करणार्‍या जळगावातील उल्हास साबळे आणि आपतक न्युज पोर्टलचे आनंद शर्मा यांच्या विरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या आदेशान्वये चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात पहिली तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये जैन इरिगेशनने दाखल केली होती. मात्र एमआयडीसी पोलीसांनी आवश्यक ती कार्यवाही न केल्याने जैन इरिगेशने न्यायालयाकडे दाद मागितली. याबाबत जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर कामकाज झाले. जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार साबळे व शर्मा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यातर्फे गुन्ह्यासंबधीत विविध पुरावे सादर करण्यात आलेत.