सामनेर येथील सरपंच, उपसरपंचांसह एक सदस्याचा राजीनामा

0

पाचोरा : मराठा आरक्षण आणि पाकीस्तानात गेलेला जवान चंदू चव्हाण याला परत आणण्यात सरकार अयशस्वी ठरल्याने या निषेर्धात तालुक्यातील सामनेर येथील सरपंच, उपसरपंच सह एका सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सकल मराठा समाजाने महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने मोर्चे काढून देखील सरकार दखल घेत नाही, त्यासोबतच भारतीय सैन्यातील जवान सामनेर येथील रहिवासी चंदू चव्हाण हा पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याने त्याला मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार देखील प्रयत्न करीत नाही या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील सामनेर येथील सरपंच प्रिती मनोज साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दि.17 रोजी सभापती कल्पना पाटील यांच्याकडे दिला आहे.

यांची दिला आपल्या पदाचा राजीनामा
सामनेर सरपंच प्रिती साळुंखे यांच्याकडे उपसरंपच प्रविण पाटील सह सदस्य अरूण पाटील यांनी आपले राजीनामे दिले आहे. सकल मराठा समाजाने हा उद्रेक असल्याने यापुढे सरकारने तात्काळ मराठा आरक्षणच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. सभापतीकडे राजीनामा देतांना सोबत उपसरपंच प्रविण पाटील, सदस्य अरुण पाटील, पंढरीनाथ पाटील, सचिन सोमवंशी, मनोज पाटील, साळुंखे, प्रविण पाटील, जगदीश ठाकरे आदी उपस्थित होते.