सामाजिक ऐक्यासाठीच काला : लहवितकर

0

-पिंपळे गुरवला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

नवी सांगवी : “वारकरी संप्रदायाने सामाजिक ऐक्यासाठी काला प्रक्रियेचा आरंभ केला. यामुळे अनेक जाती, धर्म, वंशातील लोक एकत्र जेवण करून परस्परांमधिल राग, व्देष, कलह विसरून एकत्र प्रसाद घेण्याची विचार पद्धती पुढे आली’’, असे उद्गार डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी पिंपळे गुरव येथे काढले. कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने अधिकमास पुरुषोत्तम पर्वकाळ निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते, त्याच्या समारोप प्रसंगी रामकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या काल्याच्या कीर्तनात डॉ. लहवितकर यांनी उपस्थित भाविकांसमोर त्यांनी आपले विचार मांडले.

डॉ. लहवितकर म्हणाले, महाराष्ट्राची लोकपरंपरा व लोकसंस्कृती म्हणजे वारकरी संप्रदाय. याच संप्रदायाने राष्ट्रधर्म चेतावला व एकात्मता ठेवून वैचारिक जडणघडण घडविली. महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय यांचा अनुबंध आहे. यावेळी देहुरोड कँन्टोंमेंण्ट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संजय पिंजण, संत संत तुकाराम सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक भाऊसाहेब पानमल, सांगवी दत्ताश्रमाचे तुकारामभाऊ, बब्रुवाहन वाघ, जगन्नाथ काटे, नारायण काटे, धोंडुमामा भोंडवे, सुभाष जगताप, शाम जगताप यांच्यासह सांगवी पिंपळे गुरव पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय उपस्थित होता.