भुसावळ युवा सेनेची मागणी ; पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेणार- हेमंत बर्हाटे
भुसावळ- दीपनगर औष्णिक विज निर्मिती प्रकल्पातून दररोज हजारो मेट्रिक टन राख मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण करीत चसून दीपनगर प्रशासन, अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी विद्यार्थी तसेच स्थानिक सामान्य नागरीकांची समस्या वाढली आहे. कंत्राटदार राख प्रकल्पाच्या बाहेर घेऊन जाणारी वाहने सभोतालच्या खुल्या जागांवर टाकतात तसेच दोन ट्रकमध्ये भरलेली राख एका ट्रकमध्ये टाकतात, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग सहा संपूर्णपणे राखयुक्त झाल्याने विद्यार्थी, शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत. उपाययोजना करण्यास दीपनगर प्रशासन अपयशी ठरले असून युवा सेना तालुकाप्रमुख हेमंत बर्हाटे यांच्या नेतृत्वाखाली दीपनगरच्या शक्तीगड येथे उपअभियंता एन जी.पुणेकर यांना निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी भुसावळ युवासेना तालुकाप्रमुख हेमंत बर्हाटे, शहरप्रमुख सुरज पाटील, शहर चिटणीस मयुर जाधव, म्रुगेन कुलकर्णी, विक्की चव्हाण, भुषण सोनार, शुभम गावंडे, मयुर पाटील, शुभम चौधरी, तुषार भोसले,पंकज जाधव, छोटु पाटील, अंशुल भाकरे, मनिष जैन, गौरव पवार, ललीत सैतवाल, निलेश हिवरे, प्रसाद पळशीकर, स्वप्निल मेढे, पवन जोशी, गणेश फालक, अक्षय भंगाळे, विशाल तायडे, अमोल पालोदे, कुणाल सोनवणे उपस्थित होते. दरम्यान, निवेदन स्वीकारण्यासाठी प्रकल्पात वरिष्ठ अधिकारीच नाही, म्हणून निवेदन घेतले जाणार नाही असा निरोप युवासेनेच्या पदाधिकार्यांना मिळाला म्हणून युवासैनिकांनी शक्तीगडच्या गेट समोरच धरणा मांडला. शेवटी दीड तासानंतर पुणेकर यांनी युवा सैनिकांची समजूत काढली व चर्चा केली.
सामाजिक दायीत्वाचा विसर -सुरज पाटील
शासनाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपाससून जुलै महिन्यात शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत दीपनगर विभागात केवळ फोटोसेशन पुरती वृक्षरोपांची लागवड करून शासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र आहे. लागवड करण्यात आलेल्या वृक्ष रोपांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण दिले गेले नसल्याने बहुतांश रोपे गुरा-ढोरांनी फस्त केली आहेत वृक्ष रोपे पाणी व देखभालीअभावी नाहीसे होत असल्याने वृक्ष रोपांची लागवड करून उपयोग काय ? असा प्रश्न युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील यांनी उपस्थित केला. संबंधीत विभागाच्या अधिकार्यांनी प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला तसेच महाराष्ट्र्र राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली. 12 जानेवारी रोजी या संदर्भात त्यांच्याशी भुसावळ युवा सेनेचे शिष्टमंडळ भेट देऊन चर्चा करणार आहे.