सामाजिक योगदानाबद्दल राहुल जाधव यांचा सत्कार

0

नीस्ट सामाजिक संघटनेतर्फे केले आयोजन

भोसरी : महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमीत्त नुर ए इमान सोशल तहेरीक अर्थात नीस्ट या सामाजिक संघटनेतर्फे नागरीकांना स्वच्छता आणि सुशोभिकरणाचे महत्व समजावे याकरीता व्याख्यान आणि मोफत फुल झाडांचे वाटप करण्यात आले.

नगरसेवक राहुल जाधव यांनी स्वत:च्या वाढदिवसानिमीत्त सामुदायिक विवाह सोहऴा आयोजित केला होता. तसेच राजकारण करता करता अनेक सामाजिक अनेक उपक्रम राहुल जाधव यांनी राबविले आहेत. अनेक गरिब आणि गरजू लोकांना त्यांनी मदत केली आहे व करीत आहेत. त्यांच्याकडे कोणी काही काम घेऊन आले तर काम करून देण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रस्ता सुरक्षा शिबिर आदी उपक्रमांचे आयोजन करीत असतात. या सामाजिक योगदानानिमित्त निस्टतर्फे राहुल जाधव यांचा सत्कार करण्यात आला. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास नगरसेवक शांताराम भालेकर, छञपती शिवाजी महाराज पतसंस्थेचे दत्तात्रय मोरे, विठ्ठल मोरे, संतोष जाधव, ईसाकभाई शेख, गुलाबभाई तांबोळी तसेच नागरीक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निस्टचे अध्यक्ष फिरोज चांदभाई शेख यांनी केले तर सुत्रसंचालन शिवाजी अंबिकेसर यांनी केले.

सत्कार ही चांगल्या कामाची पावती
राहुल जाधव यांचा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना आमदार लांडगे म्हणाले की, सार्वजनिक जीवनात काम करीत असताना नागरीकांच्यावतीने दिला जाणारा सन्मान हा आपण केलेल्या चांगल्या कामाची पावतीच असतो. ती पावती आज राहुल जाधव यांना मिळाली. अशा नागरी सत्कारानंतर अजून लढण्याची ताकद मिळते. तर राहूल जाधव यांनी आभाराला उत्तर देताना सांगितले की, नीस्ट ही अत्यंत चांगले सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. तसेच चिखली ते आळंदी पर्यंतची इंद्रायणी नदि स्वच्छता आमदार लांडगे यांनी लक्ष घालून करुन घ्यावी.