यावल : अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक औषधास आयुष मंत्रालय भारत सरकारने अधिकृत मान्यता दिली असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्या औषधांचे वाटप यावल शहराचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्यातर्फे प्रभागाच्या नागरीकांना करण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला किमान तीन दिवस पुरतील या पद्धतीने या गोळ्यांचे वितरण करण्यात येत असल्याचे अतुल पाटील यांनी सांगितले.
घरोघरी जाऊन केले गोळ्यांचे वाटप
होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप नगरसेवक अतुल पाटील यांनी स्वखर्चाने स्वयंसेवक व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने प्रभागात घरोघरी जाऊन केले. संपूर्ण प्रभागात एक हजार बॉटलचे वाटप करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने वाटप सुरू करण्यात येत आहे. यामध्ये फालक नगर, गंगानगर, तिरुपती नगर, गणपती नगर, कृष्ण तारानगर, पांडुरंग सराफ नगर, भास्कर नगर, गुरुदत्त नगर, व्यास नगर, विरार नगर, गणेश नगर, तडवी कॉलनी, रजा नगर, पूर्णवाद नगर व हरीओम नगर व इतर विस्तारीत भागामध्ये करण्यात येणार आहे. प्रभाग हा आपला परीवार असून काळजी घेणे हे आमचे कर्तव्य व जबाबदारी आहे, असे अतुल पाटील यांनी सांगितले. दरम्यान ज्या नागरीकांना अद्याप गोळ्या मिळालेल्या नसतील त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. या औषधीमुळे किमान पाच हजार इव्यक्तींना याचा लाभ होणार आहे.