भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यावर कोसळलेल्या संकटानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील अॅड.पुखराज हनुमदास राठोड यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 11 हजारांची मदत केली आहे. याबाबतचा धनादेश सोमवारी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे सोपवण्यात आला. प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील उपस्थित होते. कोरोनामुळे देशासह राज्यात उद्योग-धंदे ठप्प झाल्याने मोठे संकट ओढवले आहे व अशा गंभीर परीस्थितीतही मुख्यमंत्री हे प्रशंसनीय कार्य करीत असल्याने मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदनही अॅड.राठोड यांनी केले आहे.