तळेगाव : वडगाव मावळ येथील स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील 9 जोडपी विवाहबध्द झाली. सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे 5 वे वर्ष आहे. थाटामाटात झालेल्या या विवाह समारंभाला मावळातील सर्व स्तरातील मंडळींसह सुमारे दहा हजार वर्हाडी आवर्जून उपस्थित होते.
सोहळ्याचा शुभारंभ पहाटे श्री पोटोबा- जोगेश्वरी मूर्तीच्या अभिषेकाने करण्यात आला. या सोहळ्यामध्ये साखरपुडा समारंभ, हळदी समारंभ, सुमारे 10 हजार वर्हाडी मंडळींची भव्य मंडपात बसण्याची व भोजन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था नियोजनबध्द करण्यात आली होती. तसेच नवरदेवांची बग्गीमधून प्रभात बँडपथक व सुमारे 500 कार्यकर्त्यांसह भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
साखरपुडा समारंभ प्रसंगी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश अप्पा ढोरे यांनी स्वागत केले तर पंचायत समितीचे सभापती गुलाब म्हाळसकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, मावळ तालुका राष्ट्रवादी सहकार आघाडीचे अध्यक्ष सुभाष जाधव, बाळासाहेब म्हाळसकर, निवृत्ती (पुढारी) दाभाडे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम ढोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र कुडे आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी दिले आशिर्वाद
शुभविवाह प्रसंगी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश अप्पा ढोरे, मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव वायकर यांनी वधू वरांना शुभेच्छा दिल्या, माजी मंत्री मदन बाफना, आमदार संजय तथा बाळा भेगडे यांनी स्वागत केले तर खासदार श्रीरंग बारणे व हभप मंगलमहाराज जगताप यांनी शुभाशिर्वाद दिले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम ढोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, माऊली दाभाडे, सुनील शेळके , गणेश खांडगे, भास्करराव म्हाळसकर, प्रशांत ढोरे, राजेश खांडभोर, बाळासाहेब घोटकुले, सोपानराव म्हाळसकर आदींसह सुमारे 8 ते 10 हजार वर्हाडी मंडळी उपस्थित होती. विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण अन्नदान केल्याबद्दल डॉ नेमीचंद बाफना यांचा विशेष सत्कार करण्यात आला.