जळगाव – बाहेर फिरून येत असतांना सायकलवरून पडल्याने कासमावाडी येथे राहणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना 9
सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक खंडू पाटील (वय-55) रा. कासमवाडी हे रविवार सायकलवर फिरण्यासाठी गेले. घरी येत असतांना ते सायकलवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला.
नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषीत केले. मयत अशोक खंडू पाटील
हे एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होतो. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातू असा परीवार अरहे. जिल्हा शासकिय
वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले.