सायनमधील पालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रामदास कांबळे विजयी

0
मुंबई :- सायनमधील महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक १७३ मधून मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे हे ६११६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार सुनील शेट्ये यांचा 845 मतांनी पराभव केला.
शिवसेनेचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकी करिता प्रभाग क्रमांक १७३ मधून शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने मूळचे शिवसैनिक असलेले सुनील शेट्ये यांना उमेदवारी दिल्याने या चुरस निर्माण झाली होती. पण यात अखेर शिवसेनेचे कांबळे यांनी बाजी मारीत आपला गड कायम राखला आहे.