नवी दिल्ली : मलेशिया मास्टर्स 2019 स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालचं आव्हान अखेर संपुष्टात आलेलं आहे. उपांत्य फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरीनने सायनाचा 21-16, 21-13 च्या फरकाने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
उपांत्यपूर्व फेरीत सायनाने जपानच्या नोझोमी ओकुहाराला हरवत आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र कॅरोलिना मरीनसोबत तिचा निभाव लागू शकला नाही. पहिल्या सेटमध्ये सायनाने मरीनला चांगली झुंज दिली. पण मरीनने आपला सर्व अनुभव पणाला लावत 21-16 च्या फरकाने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सायना मरीनला कडवं आव्हान देईल अशी सर्वांना आशा होती. मात्र प्रत्यक्षात मरीनने दुसरा सेट अधिक सहजतेने जिंकत सामन्यात विजय मिळविला.