सारंगखेडा : घोडे विक्रीसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या येथील चेतक फेस्टीवलमध्ये आतापर्यंत दोन हजार घोड्यांची आवक झाली असून मंगळवारी एकूण 33 घोड्यांच्या विक्रीच्या माध्यमातून 15 लाख 82 हजार 900 रुपयांची उलाढाल झाली. आतापर्यंत यात्रोत्सव काळात 644 घोड्यांची विक्री झाली आहे तर या पोटी एक कोटी 86 लाख 64 हजार 100 रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.