सारंगखेडा यात्रेत 762 अश्‍वांची विक्री; 2.16 कोटीची उलाढाल

0

शहादा – जगभरात अश्‍व बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या सारगंखेडा यात्रेला 2 डिंसेबर पासून प्रारंभ झाला असुन देशाच्या कानाकोपर्‍यातुन सुमारे 2 हजाराहुन अधिक विविध प्रकारचे जातिवंत घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या यात्रेत अश्‍वप्रेमी मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातुन दाखल होऊन अश्‍व मेळाव्यामध्ये आनंद लुटतांना दिसून येत आहेत. गेल्या 13 दिवसा पासून या ऐतिहासिक अश्‍व विक्री बाजारात सुमारे 2 हजार घोडे विक्रीसाठी दाखल झाले असून गुरूवार 14 डिसेंबर अखेर पर्यंत. 762 अश्‍वांची विक्री होऊन सुमारे 2 कोटी 16 लाख 93 हजार 200 रूपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे . याञेत एव्हढ्या कमी दिवसांत विक्रमी उलाढाल झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 2 जानेवारीपर्यंत हा अश्‍व मेळावा सुरू राहणार असुन ऐतिहासिक विक्रीची नोंद होणार आहे, असे ही बोलले जात आहे. सारंगखेडा अश्‍व मेळावा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांसाठी कसा आकर्षित होईल. त्यासाठी या मेळाव्यात दररोज अश्‍वांच्या न्रुत्य स्पर्धा, शर्यत स्पर्धा यासह विविध स्पर्धाचे आजोजन करून पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. यासाठी चेतक फेस्टीव्हचे अध्यक्ष जयपालसिंह रावल हे प्रयत्नशिल आहेत.