सारंगखेडा येथील नदी पत्रातून बेकायदेशीर वाळू उपसा

0

नंदुरबार: शासनाची कोणतीही परवानगी न घेता सारंगखेडा येथील नदी पात्रातुन बेकायदेशीर वाळूचा उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या ठिकाणी हजारो ब्रास वाळूचे उत्खनन करून शासनाचे हजारो रुपयांचा महसूल बुडविण्यात आला आहे, याबाबत सारंगखेडा येथील मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून शहादा तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना अहवाल पाठविला आहे. मात्र त्यावर महसूल विभागाने अजूनही कोणतीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील केवळ टेंभा येथीलच वाळू झोनचा लिलाव करण्यात आला आहे, असे असतांना सारंगखेडा येथील झोनमध्ये वाळूचा उपसा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. याची चौकशी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.