मुंबई : सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाच्या व्यतिरिक्त ‘सिंबा’ हा चित्रपटदेखील असून आता आणखी एक चित्रपट तिच्या पदरात पडल्याचं सांगण्यात येत आहे. आता ती कार्तिक आर्यन सोबत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
इम्तियाज अली दिग्दर्शित या आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु असून या चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक आणि सारा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.