साराने आपला पत्ता पाठवावा – कार्तिक आर्यन

0

मुंबई : बॉलीवूडचा नवाब सैफ अली खानची कन्या साराने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपलं पाहिलं पाऊल टाकलं आहे. या पहिल्याच चित्रपटातून तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीही मिळाली आहे. कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये साराला कारणने एक प्रश्न विचारला होता. तुला कोणाला डेट करायला आवडेल? असा प्रश्न तिला विचारला होता. यावेळी, मला कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल असे म्हणाली.

नुकताच कार्तिकला हा प्रश्न विचारला असता, साराने आपला पत्ता पाठवावा, मी वाट पाहतोय, असे उत्तर कार्तिकने दिले. कार्तिक पुढे म्हणाला, की सारा आणि मी काही वेळा पार्टीमध्ये भेटलो आहे. मात्र, आमच्यात केवळ हाय-हॅलो इतकंच बोलणं होतं.