सार्वजनिक गुजराती शाळेत गुरुपौर्णिमा व ईद मिलाद

0

नवापूर । येथील सार्वजनिक गुजराथी हायस्कूलमध्ये इयत्ता 11 व 12 वीच्या मुलांनी एकत्रितपणे गुरुपौर्णिमा व ईदनिमित्ताने कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय जाधव तर प्रमुख पाहुणे निलेश प्रजापती उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीपपूजन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना उर्वी प्रजापती या विद्यार्थीनीने केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शालेय जीवनावर आधारीत युवा ही नाटिका सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांमधून जुगणु धोंडिया तर शिक्षकामधून मर्चंट सर, ठाकरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी निलेश प्रजापती यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक जीवनात पण दुसर्‍याचा सन्मान करावा. स्नेहबंध कायम राखण्याचे आवाहन केले.

ऊर्दू शिक्षकांमार्फत शिरखुरमाचा कार्यक्रम
प्राचार्य संजय जाधव अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की आमची विद्यार्थ्यांकडून एकच अपेक्षा असते की त्याची प्रगती व्हावी तो चांगल्या पदावर गेल्यास आमचे मन अभिमानाने फुलते तसेच विद्यार्थी नम्र व आदर करणारा असावा वर्गात शरीराने न बसता त्याने मनाने बसावे. तरच ज्ञान पदरी पडेल व ध्येय साध्य करता येईल.या कार्यक्रमात ईद निमीत्ते उर्दू विभागामार्फत मुलांनी गीत सादर केले. तसेच ऊर्दू विभागातील शिक्षकांमार्फत शिरखुरमाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा व ईदनिमत्ते खीरखुर्मा हा कार्यक्रमातला दुग्ध शर्करा योग होता. कार्यक्रमात प्राचार्य संजय जाधव, उपप्राचार्य आसिफ शेख, पर्यवेक्षक साकीर शेख ,चौधरी सर, निल सर, कमल मॅडम ,चव्हाण सर, संचालक जगदाळे , निलेश प्रजापती, नितीन ठाकरे, मर्चंट सर ,जब्बार मुल्ला सर्व शिक्षक बंधू व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ध्रुव देसाई व झील पारीख तर उर्दूचे शिक्षक झाकरिया यांनी शेरो शायरी सादर करत सूत्रसंचालन केले. शेवटी आभार भूमीक प्रजापती या विद्यार्थ्यांने केलेे.