सार्वजनिक मराठी हायस्कूल येथे रोगमुक्त भारत अभियान शिबिर
योग्य दिनचर्या आपले आयुष्य वाढते..डॉ आशुतोष वाडीले
हे देखील वाचा
नवापूर प्रतिनिधी
नवापूर येथील जोशाबा सरकार युवा मंडळाच्या संयोजनाने नवापूर शहरात सार्वजनिक मराठी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नुकतेच निसर्गोपचार शिबिर संपन्न झाले.
आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली यांनी सुरू केलेल्या रोग मुक्त भारत अभियानाला नवापूर तालुक्यात कोळदा शासकीय आश्रम शाळेत सुरुवात करण्यात आली होती.राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान आयुष मंत्रालय भारत सरकार अंतर्गत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत योगा व निसर्गोपचार या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक मराठी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नुकताच कुमारीका मुले व मुलींसाठी निसर्गोपचार शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी योगा व निसर्गोपचार प्रशिक्षक डॉ आशुतोष वाडीले यांनी आपली दररोजची नियोजनात्मक दिनचर्या ही आपले दैनंदिन निरोगी आयुष्य वाढवत असते. आपले शारीरिक व मानसिक संतुलन योग्य असल्यास आपण हवे त्या ध्येयापर्यंत सहज पोचू शकतो असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. पर्यवेक्षक ए बी थोरात यांनी देशव्यापी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन यासंदर्भात कौतुक केले तसेच कोण बनेगा स्वास्थ्य रक्षक या ऑनलाईन स्पर्धेचे कौतुक केले. तसेच प्रा जयश्री चव्हाण यांनी कार्यक्रमासंदर्भात मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांसाठी चा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक ए बी थोरात हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर वरिष्ठ प्राध्यापिका जयश्री चव्हाण,आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन या संघटनेचे क्षेत्रीय संयोजक डॉ नितीनकुमार माळी , प्रमोद माळी हे होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार,महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष परमपूज्य शिवानंद महाराज, राज्य संयोजक सुशांत पिसे व नवापूर एजुकेशन संस्थेचे अध्यक्ष बिपिनभाई चोखावाला यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशलकुमार माळी यांनी तर आभार श्री जोशाबा सरकार युवा मंडळाच्या सचिव नीलिमा माळी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा महेन्द्र सोनवणे, प्रा दिनेश खैरनार, धनंजय खेडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षके तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.