जिल्हा पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांचे आवाहन
जामनेर – आगामी काळात सार्वजनिक सण उत्सव साजरे करतांना पर्यावरण व समाजातील इतर घटकांची हानी होणार नाही.याची पुरेपर काळजी घेत. डि.जे., डॉल्बी साउंड सारखे वाद्य न वाजवता पारंपारिक पद्धतीचे ढोलताशे पथक, लेझीम पथक असे वाद्ये वाजवून प्रशासनाला आपले कर्तव्य पार पाडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जामनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेशोस्तव व मोहरम सणाच्या सम्नवय बैठकीत उपस्थित नागरिकांना केले. यावेळी मंचावर जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पाचोरा उप.विभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड आदी होते.
गणेशोत्सवात मंडळांनी समाज प्रबोधन, शासनाच्या विवीध समाजपयोगी योजना नागरीकां पर्यंत कशा पोहचतील अशा पद्धतीने नियोजन केल्यास विधायक कार्याला हातभार लागण्यास मदतच होणार आहे. तसेच मंडळानी स्वयंसेवक नेमून त्या आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात जेणेकरून कायदा सुव्यवस्था राखण्यास प्रशासनाला मदत होईल असे अधिक्षक शिंदे यांनी सांगितले. ना.गिरीश महाजन यांनीही यावेळी बोलतांना सांगितले की सार्वजनिक गणेशोत्सवांच्या काळात कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करणे.गरजेचे आहे. तसेच तरूणांनी व्यसनांपासून दुर राहणे हि काळाची गरज असून. जगात सगळ्यात जास्त संख्येने युवा पिढी आपल्या देशात आहे. पण हि युवा पिढी व्यसना धिनतेकडे वळत चालली आहे ही मोठी खेदाची बाब आहे. उस्तवा दरम्यान मंडळांना व प्रशासनास येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने सोडवाव्या या विषयी ही बैठकीत चर्चा करण्यात आली.