मुक्ताईनगर- तालुक्यातील सालबर्डी येथे कुटुंब गावाला गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी एक लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. शनिवारी सकाळी कुटुंब घरी आल्यानंतर चोरी उघडकीस आली. सालबर्डीतील रहिवासी रवींद्र रामा तायडे हे कुटुंबासह गावी गेल्याने घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधत कपाटातील 7 ग्रॅमची अंगठी तसेच 90 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार रघुनाथ पवार करीत आहेत.