साळशिंगी सरपंचांसह सदस्य अपात्र

0

अतिक्रमण भोवले ; नाशिक विभागीय आयुक्तांच्या निकालाने खळबळ

बोदवड– तालुक्यातील साळशिंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांना नाशिक विभागीय आयुक्तांनी अपात्र केल्याने तालुक्याच्या राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत जागेवर केलेले अतिक्रमण या लोकप्रतिनिधींना भोवल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सर्वच सदस्यांसह पदाधिकार्‍यांना घरी बसण्याची ही तालुक्यात पहिलीच वेळ असल्याचे मानले जात आहे. साळशिंगी येथील तक्रारदार उपेंद्र ज्ञानदेव इंगळे (ह.मु.वरणगाव, ता.भुसावळ) यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे 2016 मध्ये अतिक्रमणासंदर्भात तक्रार केली होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 31(1) नुसार उभयंतांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले.