सावखेड्यातील शेतातून 30 क्विंटल कापूस लंपास

0

अमळनेर । तालुक्यातील सावखेडा गावाजवळ असलेल्या पब्लिक स्कुल जवळील शेतातील घरातुन 30 क्विंटल कापसाची चोरीं झाल्याची घटना दि 12 च्या रात्री घडली. याबाबत अधिक असे कि, अमळनेर चोपडा रस्त्यावर पब्लिक स्कुल शेजारील बंद पडलेल्या ओम पेट्रोलपंपाजवळ सावखेडा येथील निंबाजी जुलाल कदम यांच्या मालकीची बागायती शेती आहे. पाटील यांच्या शेतात कापूस वेचणी सुरु असून त्यांनी त्यांच्याच मालकीच्या पंपाच्या घरात त्यांच्यासह इतरांचा कापूस जमा करून भरलेला होता. 12 रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यानी त्यातील अंदाजीत 30 क्विंटल कापुस चोरून नेला, निंबा पाटील हे सायंकाळी त्या घरात माल ठेवण्यासाठी गेले असता त्यांना दरवाजा उघडा दिसला त्यांनी आत जाऊन पहिले असता हि घटना उघडकीस आली. याबाबत निंबा पाटील यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे शेतकर्‍यांमध्ये भिती पसरली आहे.