सावत्र बापाचा 13 वर्षांच्या मुलीवर 3 वर्षे बलात्कार

0

पुणे । सावत्र बापच तेरा वर्षाच्या मुलीवर तीन वर्षापासून बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर पोलिसांच्या हद्दीतून उघडकीस आला. ही मुलगी शाळेत शांत आणि मुलांपासून अलिप्त राहत असल्याने शिक्षकांना शंका आली. त्याबद्दल शिक्षकांनी तिला विश्‍वासात घेऊन विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांचे 2010मध्ये निधन झाल्यानंतर तिच्या आईने दुसरे लग्न केले लग्न करताना आरोपीने या मुलीचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ती घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी तिच्यावर तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार करत राहिला. याप्रकरणी कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

आपल्यावर होणार्‍या अत्याचारामुळे ही मुलगी कायम घाबरलेली आणि शांत असायची. शाळेतील तिच्या बराच बदल झाला होता. हा बदल झाल्याचे पाहून काही शिक्षकांना शंका आली. त्यानंतर त्यांनी तिला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता पीडितेने सावत्र वडील आपल्यासोबत रोज अत्याचार करत असल्याची माहिती दिली. मुलीने दिलेल्या माहितीनंतर शिक्षकांनीच हडपसर पोलीस ठाण्यात नराधम पित्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनीही गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.