सावदा पालिकेकडून कर वसूलीसाठी पतसंस्थेचे कार्यालय सील

सावदा : सावदा नगरपालिका कर वसूलीसाठी जिल्ह्यात अव्वल नंबर असून नागरीकदेखील सहकार्य करीत आपला कर भरणा भरीत असतात परंतु मार्च महिना उलटल्यावरही काही मोठ्या थकबाबकीदारांनी अद्याप आपल्याकडील कर भरणा केला नसल्याने पालिकेने अश्या विरुद्ध धडक कार्यवाही सुरू केली आहे. सावदा मर्चंट पतसंस्थेकडेदेखील गेल्या अनेक दिवसांची कर थकबाकी असल्याने त्यांना पालिकेने वारंवार नोटीसदेखील बजावली पण त्यांनी कर भरणा न केल्याने सावदा नगरपालिकेने गुरुवार, 1 रोजी धडक कारवाई करीत संस्थेच्या कार्यालयास सील लावल्याने सावदा शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी थकीत कर भरणा लवकर भरावा, असे आवाहन मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे. शहरात अद्याप अनेक अश्या बंद संस्था व प्रतिष्ठान आहेत ज्यांच्याकडे मोठ्या थकबबाकी आहेत त्यांच्यावर देखील अश्या प्रकारची कार्यवाही नगरपालिका करणार असल्याचे त्यांनी सांगितले.