सावदा पालिकेत दहा जागांवर महिलांना संधी

सावदा : सावदा नगरपालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी सोमवार, 13 रोजी सावदा पालिकेत प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी शहरातील 10 प्रभागातील 20 जागांसाठी ही सोडत काढण्यात आली. यावेळी प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, सतीष पाटील यांनी यावेळी कामकाज पाहिले. यावेळी नागरीकांतून माजी नगरसेवक फिरोजखान पठाण, धनंजय चौधरी, शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, भरत नेहते, सुभद्राबाई बडगे, मुराद तडवी व नागरीक उपस्थित होते.

10 जागांवर महिलांना संधी
एकूण 10 प्रभागातून 20 नगरसेवक निवडून येणार असलेतरी दहा जागा महिलांसाठी राखीव आहेत. सोमवारी जाहीर झालेले आरक्षण असे-प्रभाग क्रमांक 4 अ- अनुसूचित जातीसाठी राखीव, प्रभाग 5 अ- अनुसूचीत जाती महिला राखीव, प्रभाग- अ हा अनुसूचित जमाती राखीव तसेच उर्वरीत प्रभागात दोन जागांपैकी एक सर्वसाधारण महिला राखीव व एक खुला प्रवर्ग (सर्वसाधारण) असे आरक्षण निघाले आहे.

प्रभागनुसार आरक्षण असे
प्रभाग क्रमांक 1 अ- सर्वसाधारण महिला, 1 ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2- अ सर्वसाधारण महिला, 2 ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 अ- सर्वसाधारण महिला, 3 ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 अ- अनुसूचित जाती, 4 ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 5 अ- अनुसूचित जाती महिला, 5 ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 अ- सर्वसाधारण महिला, 6 ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 अ- अनुसूचित जमाती, 7 ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 8 अ- सर्वसाधारण महिला, 8 ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 अ- सर्वसाधारण महिला, 9 ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 अ- सर्वसाधारण महिला, 10 ब- सर्वसाधारण. दरम्यान, आरक्षणावर हरकती व सूचनांसाठी 15 ते 21 जूनपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत असून कोणतीही हरकत न आल्यास सावदा पालिकेसाठी याप्रमाणे प्रभाग आरक्षण असणार आहे.