भाजपासह राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदारांनी नाकारले
सावदा– पालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार अल्लाबक्ष नजीर शेख 512 मते मिळवून विजयी झाले. भाजपासह राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा येथे पराभव झाला हे विशेष ! वॉर्ड क्रमांक 3 ब चे नगरसेवक स्व.प्रभाकर महाजन यांचे निधन झाल्यामुळे रीक्त जागेसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली होती तर दोन हजार 202 पैकी एक हजार 440 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीला पालिकेतील संख्याबळ कायम ठेवणे तर भाजपाला एका जागा वाढविण्यासाठी महत्वपूर्ण असलीतरी मतदारांनी येथे अपक्षाला संधी दिल्याने प्रबळ पक्षांना हा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी-भाजपाच्या उमेदवाराला नाकारले
गुरुवार, 12 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. त्यात अपक्ष उमेदवार अल्लाबक्ष नजीर शेख 512 मते मिळवून विजयी झाले. भाजपाचे विकी भंगाळे यांना 447 तर राष्ट्रवादीचे अभय महाजन यांना 375 मते मिळाली. शेख यांचा 65 मतांनी विजय झाला.