सावदा पोलिसांना वॉण्डेट आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0
भुसावळ:- सावदा पोलिसांना जबरी लुटीच्या गुन्ह्यात वर्षभरापासून वॉण्डेट असलेल्या आरोपीच्या मुसक्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या असून त्यास सावदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जितेंद्र किसन गोलाडे (28, रा.72 खोली, वाल्मीकनगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता गस्तीवर असलेल्या एएसआय आनंदसिंग पाटील, हवालदार तस्लीम पठाण, कॉन्स्टेबल विकास सातदिवे यांना संशयीत वाल्मीक नगर भागात आल्याचे कळाल्याने त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गतवर्षी चौघा आरोपींनी चाकूच्या धाकावर तृतीयपंथीयांना लुटले होते. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल होवून तीन संशयीतांना अटक करण्यात आली होती तर गोलाडे हा पसार असल्याने त्याचा शोध सुरू होता.