सावदा येथे दारूच्या नशेत युवकाची आत्महत्या

0

सावदा । सावदा येथे गुरूवार 13 जुलै रोजी दुपारी एका 21 वर्षीय युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. युवकाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचे समोर आल्यावर आंबेडकर नगरातील नागरिक पोलीस स्टेशनवर धडकल्या व तेथे सदर परिसरात होणारी अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्याची मागणी त्यांनी केली. आंबेडकर नगर भागातील रहिवासी सुनील मधुकर सपकाळे याने रहाते घराचे छतास साडी बाधून आत्महत्या केली सदर युवक हा आपल्या आजीचे घरी राहत होत त्याने दारू पिण्यासाठी घरातील गहू विकले, याबद्दल विचारणा केली असता दारूचे नशेतच रगात त्याने आत्महत्या केली असे समजते. महिलांनी पो.स्टे.त आपबिती सांगितली, यावेळी स.पो.नि. राहुल वाघ यानी त्यांचे म्हणणे एकूण घेतले शहरात दारू विक्री बंद आहे आपण कोठे चोरून विकली जात असल्यास त्याचा तात्काळ बंदोबस्त करू असे या महिलांना सांगितले सावदा पो.स्टे.ला. अकस्मात मृत्यूची नोंद झाली.घटनास्थळी उपनगराध्यक्षा नंदाताई लोखंडे यांनी भेट दिली.