सावदा येथे महसूल विभागातर्फे थकबाकी वसुली मोहीम ; अनेकांना नोटीसा

0

फैजपूर – सावदा येथे महसूल विभागातर्फे अकृषिक थकबाकी असणार्‍या मालमत्ता धारकांकडे शासकीय महसूल थकबाकी मोठ्या प्रमाणात बाकी असल्याने थकबाकी धारकांना महसूल विभागाने नोटीसा जारी करून त्या मालमत्तेवर लावल्या आहेत. सावदा-फैजपूर रस्त्यावरील पंजाब धाब्यावर देखील अशीच नोटीस बजाविण्यात आली असून सात दिवसात थकबाकी न भरल्यास सदर मालमत्ता सरकार जमा करण्यात येईल, असे नोटीसीत नमूद करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी शरीफ तडवी, तलाठी मीना तडवी व कर्मचारी उपस्थित होते. अनेक थकबाकी धारकांना या नोटीसी देण्यात आल्या असल्याचे सावदा महसूल मंडळ अधिकारी शरीफ तडवी म्हणोल. सावदा शहरात अनेक अकृषिक धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून ती वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. थकबाकी लवकरात लवकर जमा भरणा करावी अन्यथा अश्या मालमत्ता सरकार जमा करण्यात येतील, असा इशारा सावदा मंडळाचे मंडळ अधिकारी शरीफ तडवी, तलाठी मीना तडवी यांनी दिला आहे.