सावदा-रावेर रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन : नागरीकांमध्ये घबराट

0

सावदा- सावदा-रावेर रस्त्यावर गुरूवार, 22 रोजी सकाळी 10 वाजे दरम्यान सावदा जवळील भारातिक बाबा मंदिराजवळील श्रीराम पेट्रोल पंपाजवळ नागरीकांना
पट्टेदार वाघ उडी मारून कोचूर भागात जाताना दिसल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली. वाघाच्या दर्शनामुळे दुचाकीस्वारांनी जागेवरच वाहने थांबवली. वनविभागाने या घटनेची खातरजमा करून वाघाचा या भागात संचार असल्यास दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त हात आहे. हा भाग पाल जवळील सातपुड्याला जोडणारा असल्याने अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे मात्र प्रथमच वाघाचे या भागात दर्शन झाल्याने याची दखल वनविभागाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.