सावदा व रावेर स्थानकाला डीआरएम यांची सरप्राईज व्हिजीट

0
पेट्रोलमनच्या जाणल्या समस्या ; बॅटरी पुरवण्याचे आदेश
भुसावळ :- सावद्यासह रावेर रेल्वे स्थानकावर डीआरएम आर.के.यादव यांनी शनिवारी रात्री अचानक सरप्राईज व्हिजीट देत तपासणी केली. सावदा रेल्वे स्थानकावर पाण्याची समस्या आढळल्याने तत्काळ त्याबाबत संबंधित विभागाने समस्या निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले. यादव यांनी गेट नंबर 172 ला भेट देऊन पेट्रोलमनशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रेल्वेच्या सुरक्षेत पेट्रोलमनची महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांना तातडीने बॅटरी व बॅटरी पुरवण्याचे निर्देश देण्यात आले.