सावद्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीसाठी कार्यवाही सुरू

0
नागपूर-जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी पदनिर्मितीसाठी मान्यता दिलेली असून या रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी अंदाज आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव प्राप्त झालाय.  त्यावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी उत्तरात दिली आहे. या संदर्भात माजी मंत्री आमदार  एकनाथराव खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
सावदा येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी पदनिर्मिती आणि नव्या इमारतीसाठीचा प्रस्तावास मान्यता देण्याची मागणी मे 2018 मध्ये निवदेनाद्वारे आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना करण्यात आली होती, यावर काय कार्यवाही केली असा प्रश्न आमदार खडसे यांनी विचारला होता. यावर डॉ. सावंत यांनी या रुग्णालयाच्या पदनिर्मितीस 23 मे 2018 ला मान्यता दिल्याचे सांगीतले आहे. रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी अंदाज आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.