21 व्या वर्धापनदिनानिमित्त साईनाथ अॅग्रो एजन्सीचा उपक्रम
रावेर- शेतकर्यांना नवसंजीवनी देणारी नव तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक शेतीकडे शेतकर्यांना वळविणार्या साईनाथ अॅग्रो एजन्सीकडून 21 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शेतकर्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवण्यात आले तर तब्बल विविध कंपन्यांनी 40 स्टॉल लावून शेती उत्पादनांची माहिती दिली. या स्टॉलला तालुक्यातील हजारो शेतकर्यांनी भेट देत माहिती जाणून घेतली.
वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम
रावेर तालुक्यात हाय-टेक शेतीला प्रोत्साहन देणे, नवनवीन तंत्रज्ञान अवगत करणे, शेतकर्यांना पिकांद्वारे भर-भरून उत्पन्न कसे मिळेल यासाठी प्रयत्न करने, विविध पिकांवर आलेल्या रोगासांठी औषधी व फवारणीची सामग्री साठा असणार्या साईनाथ अॅग्रो एजंन्सी व साईनाथ इरीगेशनने आपल्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी महापूजा सावदा येथील शॉपमध्ये केली. यावेळी शेतकर्यांना कृषी उत्पादनांची माहिती होण्यासाठी भारत भरातील नामांकीत कंपन्यांचे दर्जेदार कृषी उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले. यावेळी रावेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्गाने जास्तीत-जास्त संख्येने हजेरी लावून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
40 कंपन्यांनी लावले स्टॉल
साईनाथ अॅग्रो एजन्सीमार्फत राज्यभरातील सुमारे 40 विविध कंपन्यांचे कृषी स्टॉल लावण्यात आले. यामध्ये औषध फवारणी, शेतीसाठी नवीन तंत्र, विविध खते, बियाणे, ठिबक नळ्या यासह विविध शेती संदर्भात कृषी स्टॉल लावण्यात आले.